नाशिक: पत्नी माहेरी गेल्याने पतीची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक: पत्नी माहेरी गेल्याने पतीची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): पत्नी माहेरी गेल्याने युवकाने आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

नाशिकच्या मॉडेल कॉलनी येथे ही घटना घडली.

पत्नी सहा महिन्यांपासून माहेरी गेल्याने तणावग्रस्त झालेल्या पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मॉडेल कॉलनीतील वसंतविहार सोसायटीत उघडकीस आला.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी नीलेश देशमुख यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मोठा भाऊ अमोल अशोक देशमुख (४०) यांचे व पत्नीचे वाद सुरू असल्याने ते एकटेच रहात होते. रात्री ते जेवण करून त्यांच्या घरी गेले. सकाळी ते न आल्याने त्यांच्या घरी जाऊन त्यांना आवाज दिला असता प्रतिसाद न आल्याने पोलिसांना कळवले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता बेडरूमच्या पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: कोयत्याचा धाक दाखवून, मारहाण करून एकास लुटले..
नाशिक: नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790