नाशिक: बंदुकीचा धाक दाखवत शेजाऱ्यानेच केला महिलेचा विनयभंग

नाशिक (प्रतिनिधी): बंदुकीचा धाक दाखवत शेजाऱ्यानेच महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

खुटवडनगर भागात हा प्रकार घडला आहे.

अरविंद गुलाब चक्रनारायण असे या संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खुटवडनगर भागात छ-याच्या बंदूकीचा धाक दाखवत शेजा-याने घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली.

हे ही वाचा:  नाशिक: अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या संशयितांना कोठडी

याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद गुलाब चक्रनारायण (रा.वेणूनगर,खुटवडनगर) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिला व संशयित एकाच सोसायटीतील रहिवासी असून ते एकमेकांचे शेजारी आहेत. १ जानेवारी २०२० ते ५ मे २०२२ या काळात संशयिताने वेळोवेळी हे कृत्य केल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

हे ही वाचा:  महावितरणच्या नाशिक परिमंडळ मुख्य अभियंतापदी सुंदर लटपटे रुजू

महिला एकटी असतांना बळजबरीने घरात प्रवेश करून संशयिताने शरिरसुखाची मागणी करीत विनयभंग केला होता. यावेळी त्याने छ-याच्या बंदूकीचा धाक दाखवत याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र कुटुंबिय घरात नसतांना त्याचे येणे जाणे वाढल्याने त्रस्त झालेल्या महिलेने पोलिसात धाव घेतली असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खतेले करीत आहेत.

हे ही वाचा:  नाशिकला उन्हाचा चटका; सोमवारी कमाल तापमान 'इतके' नोंदविले गेले

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790