Amazon

नाशिक: कोयत्याचा धाक दाखवून, मारहाण करून एकास लुटले..

नाशिक: कोयत्याचा धाक दाखवून, मारहाण करून एकास लुटले..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

कोयत्याचा धाक दाखवून एकाला लुटल्याची घटना घडली आहे.

या घटनेत तब्बल फिर्यादीला मारहाण करून ६२ हजाराचा ऐवज लुटून नेण्यात आला आहे.

कोयत्याचा धाक दाखवून युवकाच्या खिशातून दहा हजार रुपये, मोबाईल, सोन्याची चेन व अंगठी असा सुमारे 62 हजारांचा ऐवज बळजबरीने लुटून नेणार्‍या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंक बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८४ प्रवाशांवर कारवाई; १४ हजारांचा दंड वसूल

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यासीन मोहंमद सय्यद (वय 23, रा. वरची गल्ली, देवळाली गाव) याला काल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सॅण्डी वेफर्सच्या बाजूकडील रस्त्यावर आरोपी किरण लवटे, दानिश शेख व त्यांचे इतर चार साथीदार (सर्व रा. देवळाली गाव, नाशिकरोड) यांनी सय्यद याला अडविले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

त्याला कोयत्याचा धाक दाखवून सय्यद याच्या खिशातील दहा हजार रुपये रोख, 40 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, आठ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व चार हजार रुपये किमतीचा मोबाईल असा सुमारे 62 हजारांचा ऐवज मारहाण व दुखापत करून बळजबरीने लुटून नेला.

🔎 हे वाचलं का?:  सुरगाण्यात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप; नाशिक शहरापासून ५३ किलोमीटरवर केंद्रबिंदू

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक भालेराव करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790