
नाशिक: कोयत्याचा धाक दाखवून, मारहाण करून एकास लुटले..
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
कोयत्याचा धाक दाखवून एकाला लुटल्याची घटना घडली आहे.
या घटनेत तब्बल फिर्यादीला मारहाण करून ६२ हजाराचा ऐवज लुटून नेण्यात आला आहे.
कोयत्याचा धाक दाखवून युवकाच्या खिशातून दहा हजार रुपये, मोबाईल, सोन्याची चेन व अंगठी असा सुमारे 62 हजारांचा ऐवज बळजबरीने लुटून नेणार्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- नाशिक: नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा
- दुर्दैवी: नाशिकमधील पाटील दाम्पत्याचा अमेरिकेत अपघाती मृत्यू
- नाशिक: फोटो व्हायरल करण्याच्या धमक्यांना कंटाळून विवाहितेची आत्महत्या
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यासीन मोहंमद सय्यद (वय 23, रा. वरची गल्ली, देवळाली गाव) याला काल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सॅण्डी वेफर्सच्या बाजूकडील रस्त्यावर आरोपी किरण लवटे, दानिश शेख व त्यांचे इतर चार साथीदार (सर्व रा. देवळाली गाव, नाशिकरोड) यांनी सय्यद याला अडविले.
त्याला कोयत्याचा धाक दाखवून सय्यद याच्या खिशातील दहा हजार रुपये रोख, 40 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, आठ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व चार हजार रुपये किमतीचा मोबाईल असा सुमारे 62 हजारांचा ऐवज मारहाण व दुखापत करून बळजबरीने लुटून नेला.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक भालेराव करीत आहेत.