नाशिकला अभ्यासाच्या तणावातून १८ वर्षीय विद्यार्थ्याची आ त्म ह त्त्या

नाशिक (प्रतिनिधी): कामटवाडे परिसरातील १८ वर्षीय विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावातून गळफास घेत आ त्म ह त्त्या केली.

बारावी उत्तीर्ण झालेला हा विद्यार्थी नीटच्या परीक्षेची तयारी करीत होता. शिवम हेमंत पाटील असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बँकेतून बोलत असल्याचे भासवत वृद्धाच्या खात्यातून ९५ हजार लांबवले

शिवम हा बारावी उत्तीर्ण झालेला असून, मेडिकलला प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षेची तयारी करीत होता.

नीटची परीक्षा येत्या रविवारी (ता. ७) होती. परंतु, या अभ्यासाच्या तणावातूनच त्याने गेल्या रविवारी (ता. ३०) मध्यरात्री राहत्या घराच्या छताच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने ग ळ फा स लावून घेत आ त्म ह त्त्या केली. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790