पंचवटी: कंटेनरच्या धडकेत दुचाकीचालक ठार

पंचवटी: कंटेनरच्या धडकेत दुचाकीचालक ठार

नाशिक (प्रतिनिधी): दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक ठार झाला.

अमृतधामकडून तारवाला सिग्नलकडे जाताना पुलावर हा अपघात घडला.

पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती व मंगेश दांडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मित्रासोबत दुचाकीने सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात असताना विहान हॉटेलजवळ पाठीमागून भरधाव वेगात येणारा कंटेनर ( डीएन ०९ आर ९७९९)ने तारवाला सिग्लनकडून येणारी दुचाकीला ( एमएच १५ एफएच ०२५६ ) धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कंटेनरखाली दुचाकी अडकून दूरपर्यंत फरपटत नेली या अपघातात चालक दीपक विलास चव्हाण (वय: ३५, राह्णार शरयू पार्क) यांच्या डोक्यास गंभीर मार लागला त्यांना दवाखान्यात नेले असता उपचार सुरू होण्यपूर्वी मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात कंटेनरचालक संतोष गणेश पांचाळ (रा. नांदेड) याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: आठवीच्या अपहृत विद्यार्थ्याचा खून; वडीवऱ्हे येथे आढळला मृतदेह

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790