नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 7 मे रोजी आयोजन

नाशिक। दि. १ मे २०२६: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक मार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड, जि.नाशिक या ठिकाणी जिल्ह्यातील STEP अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांसाठी गुरूवार 7 मे 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे ६३४ ग्रॅम सोन्याची लगड अवघ्या चार तासांत मालकाकडे परत

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावासाठी जिल्ह्यातील विविध औद्योगिक आस्थापना युवक- युवतींना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असून प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत.

नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. रिसे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790