नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ८ डिसेंबर २०२१) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ८ डिसेंबर २०२१) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे.
नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ४६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: ३२, नाशिक ग्रामीण: १४, मालेगाव: ०० तर जिल्हा बाह्य: ०० असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात बुधवारी नाशिक ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक आतापर्यंत एकूण ८७३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ४० रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक शहरातसुद्धा दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिकांनी काळजी घेणं कमी केलं. मात्र असं करून चालणार नाही. लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तरीही नागरिकांनी नियम पाळणे गरजेचं आहे. नाशिक शहरात रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये अजूनसुद्धा अनेक नागरिक मास्क न घालता फिरतांना दिसत आहेत. कोरोनाला आळा घालायचा असेल तर नियम पाळणे आजही गरजेचे आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिककरांना आता मिळणार निडल फ्री लस ! असं आहे हे तंत्रज्ञान…
घाण व कचरा: नंदिनी नदीकिनारी गोविंदनगर ते उंटवाडीपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा
WhatsApp वर काही सेकंदात डाउनलोड करा Covid-19 Vaccine Certificate, पाहा सोपी प्रोसेस