नाशिक शहरात सशस्त्र दरोडा; घरातून ६ ते ७ लाखांची रक्कम लुटून 65 वर्षीय वृद्धाचा खून

नाशिक शहरात सशस्त्र दरोडा; घरातून ६ ते ७ लाखांची रक्कम लुटून 65 वर्षीय वृद्धाचा खून

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात दरोड्याचे सत्र सुरुच असून शहरातील अंबड लिंक रोड परिसरात दरोडा पडल्याची घटना घडली आहे.

या दरोड्यात 65 वर्षीय वृद्धाचा खून करून घरातील ६ ते ७ लाख रुपयांची रक्कम लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात उष्णतेची तीव्रता वाढणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट

बच्चू सदाशिव करडेल असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे…

गेल्या काही दिवसांत नाशिक शहरासह ग्रामीण भागात वाढत्या दरोड्याचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय वाढत्या घरफोड्यांनी जिल्ह्यात दरोडेखोरांची टोळी सक्रिय आहे का असा प्रश्न उभा राहतोय.

शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉईंट येथे दरोडेखोरांनी लूटमार करुन 65 वर्षीय वृद्धाचा खून केल्याची घटना घडली आहे.

🔎 हे वाचलं का?:  बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिला अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट...

अंबड लिंकरोड परिसरात करडेल कुटुंब वास्तव्यास आहे. काल (25 नोव्हेंबर) सायंकाळी करडेल यांच्या चुलत भावाच्या मुलाची हळद समारंभ असल्यामुळे घरातील इतर सदस्य बाहेर गेले होते. बच्चू करडेल हे घरात एकटेच असताना दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. करडेल यांना कुणीतरी आल्याची कुणकुण लागताच, त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर तोंड बांधलेले काही दरोडेखोर असल्याचे समजले. करडेल यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरोडेखोराने करडेल यांच्या घरातील सुमारे सहा ते सात लाखांची रोकड असलेली कोठी दरोडेखोराने लंपास केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790