धक्कादायक: नाशिक शहरात मंगळवारी 80 कोरोनाबाधित रुग्ण; 8 जणांचा मृत्यू

नाशिक(प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि.२३ जून) दिवसभरात तब्बल ८० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहराला कोरोनाचा धोका हा दिवसेंदिवस वाढतो आहे. त्याचप्रमाणे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील नगररचना विभागातील ११ कर्मचाऱ्यांचे स्वाब घेतले असून ते सर्व जणांचे स्वाबचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. उर्वरित २२ पैकी कुठल्याही कर्मचारी अधिकारी यांच्यात लक्षणे नाहीत.त्या सर्वांचे स्वाब हे बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर ०५ दिवसांनी घेण्यात येणार आहेत. या सर्व २२ जणांना  घरगुती अलगीकरण करण्यात आलेले आहे.

नाशिक शहरात मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: फुले नगर-३, हरी मंझील-१, हिरावाडी-१, मोठा राजवाडा-१, शिंगाडा तलाव -१, नाशिकरोड-१, इतर-१, बुधवार पेठ-१, सातपूर-१, एमएचबी कॉलनी (सातपूर)-१, प्रगती कॉलनी-१, इंदिरा नगर-१, वडाळा-२, पंचवटी कॉलेज जवळ-२, हनुमानवाडी (पंचवटी)-१, जयाबाई कॉलनी-१, मंगलमुर्ती नगर (जेलरोड)-१, अयोध्या नागरी (उपनगर)-१, ओम नगर (पंचवटी)-१, पिंपळगाव खांब-१, रासबिहारी रोड-१, जय भवानी रोड-१, उपनगर-८, सिव्हील हॉस्पिटल-३, गोसावी वाडी (नाशिकरोड)-१, फुले नगर-१, पखाल रोड-१, बोहोर पट्टी-१, दुध बाजार-१, आडगाव-१, पिंजार नगर-१, हिरावाडी-१, खुटवड नगर-२, अजमेरी चौक-१, पेठ रोड-१, प्रेरणा चौक (उत्तम नगर)-१, श्रमिक नगर-१, रामवाडी-२, नाईकवाडीपुरा-१, अवधूत वाडी-२, फुले नगर-२, सिडको-१, श्रमिक नगर-२, साई आराधना सोसायटी (बजरंगवाडी, नाशिक पुणे रोड)-३, बजरंगवाडी-१ यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: विसर्जन मिरवणुकीतील लेझर लाईटमुळे तरुणांच्या डोळ्यांत उतरलं रक्त

तर नाशिक शहरात मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: या प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: पंचवटी – १, ओम नगर – २ , पेठ रोड- १, कोणार्क नगर – १, राणे नगर – १, संत कबीर नगर (द्वारका) – १, पुष्पक नगर – १, फुले मार्केट (जुने नाशिक) – १, सम्राट सिग्नेचर, सिरीन मिडोस (गंगापूर रोड) – १, सिद्धिविनायक अपार्टमेंट (गंगापूर रोड) -१, दुर्गा पार्क (बोधले नगर) – १, बागवान गल्ली (वडाळा रोड) – १, भिमगिरी अपार्टमेंट (जेलरोड) –१ यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: अंबड औद्योगिक वसाहतीतील गोदामांना भीषण आग

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790