नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात कोरोनाची वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता व्यावसायिकांनीच स्वयंघोषित लॉक डाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वप्रथम मेनरोड आणि त्यापाठोपाठ पंचवटी आणि नाशिकरोड परिसरात स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद ठेऊन लॉक डाऊन पाळण्याचा निर्णय संबंधित परिसरातील नागरिक तसेच दुकानदारांनी घेतला.
त्यानंतर आता प्रभाग क्र. २३, ३०, ३१ मधील पाथर्डी ते नासर्डी हा भाग किमान सहा दिवसांसाठी जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. यासंबंधित चर्चा करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी परिसरातील नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी एकमताने प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर उद्यापासून (दि.२५) ते मंगळवार (दि.३०) अशा सहा दिवसांसाठी जनता कर्फ्यू असणार आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा, मेडिकल, हॉस्पिटल इत्यादी सुरु राहणार आहेत.