नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक: कारची दुचाकीला धडक; दुचाकीवरील दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): मनेगाव येथे नातेवाईकाच्या दशक्रियाविधीसाठी दुचाकीवरुन जाणाऱ्या शिंदे येथील दोन जेष्ठ नागरिकांचा नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर बायपासवर कारच्या धडकेत दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना काल (दि. १६) सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली.
भास्कर खंडू तुंगार (६३) व शंकर महादू सोनवणे (६९) दोघे रा. शिंदे ता. नाशिक अशी मृत ज्येष्ठ नागरिकांची नावे आहेत.
भास्कर तुंदार व शंकर सोनवणे हे दोघे शिंदे येथून मोटारसायकलने मनेगाव येथे नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी निघाले होते.
सिन्नरजवळ आल्यानंतर सिन्नर बायपासवरून नाशिक-पुणे महामार्गाने जाऊन मनेगाव फाट्याजवळ वळत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने (क्र. एम. एच. १५, एच. जी. – ७६९२ ) ने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात दोन्ही ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले.
- कुबेश्वर धामच्या रुद्राक्ष महोत्सावातील चेंगराचेंगरीत नाशिकच्या महिलेचा मृत्यू
- नाशिक: पंचवटीत अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत २६ वर्षीय दुचाकीस्वार युवक ठार
दोघांच्याही डोक्याला मार लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही वृद्धांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनवणे यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत खैरनार यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. तर तुंगार यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नाशिकमध्ये जॉब शोधताय ? इथे क्लिक करा…
याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक चेतन मोरे करत आहेत..