राज्यात १२ ते १४ जून पावसाचा ऑरेंज अलर्ट

पुणे। दि. ११ जून २०२५: राज्यात मान्सून सक्रिय होऊन गुरुवारपासून पावसाची तीव्रता वाढणार आहे. यात द. कोकण आणि द. मध्य महाराष्ट्रात १२ ते १४ जून दरम्यान मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात २० ते २४ एप्रिलदरम्यान वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

या दरम्यान मान्सून संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे. तामिळनाडू किनारपट्टी ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा ट्रफ पसरला आहे. याशिवाय उत्तर ओडिशा आणि लगतच्या भागात हवेची द्रोणीय स्थिती असून, हे क्षेत्र हळूहळू महाराष्ट्राकडे सरकेल. याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस मान्सूनही सक्रिय होईल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790