Amazon

नाशिक: ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरच्या वाहतुकीत महत्वाचे बदल

नाशिक। दि. ३१ ऑक्टोबर २०२६: महाकुंभमेळ्याचे ध्वजारोहण शनिवारी (दि. ३१) त्र्यंबकेश्वरमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असून वाहनचालकांनी त्या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी यांनी केले आहे. शनिवार रात्री ८ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहे. वाहनचालकांनी बंदोबस्तावरील पोलिस व महसूल कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये किमान तापमानात अचानक वाढ; १४.३ वरून थेट १८.९ अंशांवर

या रस्त्यांवर प्रवेश बंद:
नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता : पिंपळगाव खांब – खंबाळे अंजनेरीमार्गे पेगलवाडी फाटा-त्र्यंबकेश्वर.
जव्हार-मोखाडा, अंबोली-त्र्यंबक पेगलवाडी-खंबाळेमार्गे नाशिक.
वैतरणाफाटामार्गे पहिने-त्र्यंबकेश्वर रस्ता.
पहिने-पेगलवाडी-नाशिक रस्ता.
पहिने-पेगलवाडी- त्र्यंबकेश्वर रस्ता

पर्यायी मार्ग असे:
त्र्यंबकेश्वरमध्ये येण्यासाठी व तेथून जाण्यासाठी वाहनचालकांनी जव्हार-मोखाडा-अंबोली टी-पॉइंट-वाघेराफाटा-कोने-साप्ते-गिरणारे-गोवर्धन-बारदानफाटा-अमृतगार्डनमार्गे पुढे जाईल.
वैतरणाफाटा-नाशिक-अमृतगार्डन-बाारदानफाटा-गोवर्धन-गिरणारे, धोंडेगाव-त्र्यंबकेश्वर.
पहिने-आहुर्ली-सांजेगाव-वाडीव-हेमार्गे नाशिक.
पहिने-भिलमाळ-निरगुडपाडा-जांभुळपाडा-सापगाव-त्र्यंबकेश्वर.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790