Amazon

सिंहस्थ महाकुंभमेळा ध्वजारोहण सोहळा; रामतीर्थ येथे गंगापूजन व धार्मिक विधी

नाशिक। दि. ३० ऑक्टोबर २०२६: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या शुभारंभानिमित्त शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी सपत्नीक नाशिक येथील रामतीर्थावर गंगापूजनासह विविध धार्मिक विधी केले.

🔎 हे वाचलं का?:  त्र्यंबकेश्वरमध्ये ३० व ३१ ऑक्टोबर रोजी वाहतुकीत बदल

यावेळी महापौर हिमगौरी आडके अहिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, भक्तीचरणदास महाराज, जगद्गुरू नरेंद्राचार्य, जगद्गुरू वल्लभाचार्य महाराज, तसेच पुरोहित संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिककरांनो आज (दि. ३०) शहरातील वाहतूक मार्गांत महत्वाचे बदल; कामावर जाण्याआधी नक्की वाचा...

या धार्मिक विधींमध्ये गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, सर्वतोभद्र मंडळ पूजन, योगिनी पूजन, क्षेत्रपाल पूजन आणि ध्वजस्तंभ स्नपन विधी करण्यात आले. यावेळी ध्वजस्तंभ प्राणप्रतिष्ठेचाही धार्मिक विधी पार पडला.

दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन राष्ट्रपती महोदयांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा व व्यवस्थेचा आढावा घेतला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790