🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: युवकाचा संशयास्पद मृत्यू; खून करून मृतदेह फेकल्याचा संशय

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकला गुन्हेगारीचे सत्र थांबायचं नाव नाहीये. जेल रोडला पंचक गावातील युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. युवकाची हत्या करून मृतदेह टाकण्यात आल्याचा संशय आहे.

ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड (वय ३०), असे मृत युवकाचे नाव आहे.

ज्ञानेश्‍वर ३ सप्टेंबरला दुपारी मित्रासोबत चाललो, असे सांगून दुचाकीवर गेला. मात्र पुन्हा घरी परत आलेला नव्हता. त्याची पत्नी, वडील व कुटुंबीयांनी शोध घेतला, मात्र तो मिळून न आल्याने पत्नी साधना ज्ञानेश्वर गायकवाड यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात हरवल्याबाबत तक्रार दाखल केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आजपासून दोन दिवस पावसाची शक्यता

पोलिस तपास सुरू असतानाच सोमवारी (ता. ११) दुपारी पंचक येथील गोदावरी तीरावर मलनिस्सारण परिसरात उग्र वास येऊ लागल्याने ग्रामस्थांनी नाशिक रोड पोलिसांना माहिती दिली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास वांजळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत फड, अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.

एक मृतदेह पालापाचोळ्याने झाकून ठेवल्याचे लक्षात आले. मृतदेहाची पाहणी केली असता, छातीवर खोलवर जखमा दिसून आल्या. चेहऱ्यावर सिमेंट टाकलेले आढळून आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनात झाडांसाठी आज (दि. २१) लाक्षणिक उपोषण

मृतदेह सात ते आठ दिवसांपासून टाकून दिला असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांनी तपास केला असता, तो मृतदेह ज्ञानेश्वर गायकवाड याचा असल्याचे नातेवाइकांनी ओळखले.

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त आनंदा वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत ज्ञानेश्वर गायकवाड हा युवक मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. त्याच्यामागे वृद्ध वडील, पत्नी आणि एक लहान बाळ आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790