नाशिक: आजपासून तीन दिवस पावसाचा अंदाज !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकसह छत्रपती संभाजीनगरला ११ ते १३ मे दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

तसेच पुढील पाच दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, १३ व १४ मे रोजी विदर्भात तर ११ व १२ मे दरम्यान काही ठिकाणी तुरळक पाऊस होऊ शकतो. ११ मे रोजी धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा जालना, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790