नाशिक : तापमानाचा पारा वाढला; वाऱ्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा

नाशिक। दि. १० मार्च २०२६: शहर आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली असून कमाल तापमानाचा पारा ३७.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. मात्र सोमवारी (दि. ९) दुपारनंतर वारा वाहू लागल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांपासून काहीसा दिलासा मिळाला. सायंकाळी कमाल तापमान ३६.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

दरम्यान, किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून मागील दोन दिवसांच्या तुलनेत तापमानात अत्यल्प घट झाली आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात वाढलेल्या तापमानामुळे शहरातील नागरिकांना उष्णतेचा आणि उकाड्याचा त्रास जाणवत आहे.

दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता वाढत असल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांतील प्रमुख रस्त्यांवरील वर्दळही कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790