नाशिक: मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करणे व केंद्रामध्ये बदल करण्याची सुविधा उपलब्ध

नाशिक। दि. ६ ऑगस्ट २०२६: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यानुषंगाने पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी व मतदान केंद्रामध्ये आवश्यक बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व परिपूर्ण करण्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी सहकार्य करावे व विहित नमुन्यातील अर्ज वेळेत सादर करावेत, असे आवाहन 125 नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी शुभांगी भारदे यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : पुरातत्त्व संवर्धनाच्या कामांना गती देण्याचे डॉ. किरण कुलकर्णी यांचे निर्देश

ज्या पात्र भारतीय नागरिकांचे वय दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक झाले असून त्यांचे नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट झालेले नाही, अशा मतदारांनी फॉर्म क्रमांक 6 भरून संबंधित मतदान केंद्राच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करून घ्यावे. तसेच ज्या मतदारांचे नाव सध्या एका मतदान केंद्राच्या मतदार यादीत असून ते कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेले आहेत किंवा त्यांना नवीन राहत्या पत्त्यानुसार दुसऱ्या मतदान केंद्राच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करावयाचे आहे. त्यांनी फॉर्म क्रमांक 8 भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा करावेत.

🔎 हे वाचलं का?:  SIR: विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात बदल; अंतिम मतदार यादी आता २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

अर्जासोबत राहण्याचा पुरावा, वयाचा पुरावा, ओळखपत्र आदी आवश्यक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्जातील सर्व माहिती अचूक व संपूर्ण भरावी. मतदारांना अर्ज भरण्यासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडून आवश्यक मार्गदर्शन मिळेल. तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ECINET/Voter Services सुविधेचा वापर करावा, असेही आवाहन 125 नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती भारदे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790