नाशिक (प्रतिनिधी): नाशिक (पूर्व) विधानसभा मतदासंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च विषयक पहिली तपासणी ही खर्च निरीक्षक डॉ. पेरीयासामी (आयआरएस) यांच्या उपस्थितीत आज ७ नोव्हेंबर २०२४ रोजी शासकीय विश्रामगृहातील शिवनेरी सभागृहात पार पडली. या खर्च तपासणीसाठी एकूण १३ उमेदवारांपैकी सर्वजण उपस्थित होते, अशी माहिती १२३- नाशिक (पूर्व) विधानसभा मतदासंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या बैठकीत खर्च निरीक्षक डॉ. पेरीयासामी यांनी सर्व उमेदवारांच्या नोंदवह्यांची तपासणी केली. यावेळी जिल्हा नोडल अधिकारी दत्तात्रय पाथरूट, सहाय्यक नोडल अधिकारी माधव थैल, सहाय्यक खर्च निरीक्षक दिलीप पांढरपोटे, पथक नियंत्रक सुभाष घुगे, पथक प्रमुख मनोज परदेशी यांच्यासह खर्च लेखांकन पथकातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याच्या दिनांकापासून ते ५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सादर केलेल्या खर्चाचा तपशिल खालीप्रमाणे:
उमेदवाराचे नाव आणि खर्चाची रक्कम (रुपयात):
👉 गणेश बबन गिते (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार): रु. ३,२६,९८९
👉 प्रसाद (बाळासाहेब) दत्तात्रय सानप (महाराष्ट्र नवनिर्माण सेना): रु. ११,५७८
👉 प्रसाद पांडुरंग जमखिंडीकर (बहुजन समाज पार्टी): रु. ३६,९३५
👉 अॅड. राहुल उत्तमराव ढिकले (भारतीय जनता पार्टी): रु. ७,९२,२९३
👉 करण पंढरीनाथ गायकर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष): रु. २,१७,५११
👉 चंद्रकांत पांडुरंग थोरात (आझाद समाज पार्टी (कांशी राम)): रु. ११,४३५
👉 अॅड. दत्ता ज्ञानदेव अंभोरे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)): रु. ६,८००
👉 प्रसाद काशिनाथ बोडके (राष्ट्रीय समाज पक्ष): रु. १०,८६०
👉 जितेंद्र नरेश भाभे (जितेंद्र भावे) (निर्भय महाराष्ट्र पार्टी): रु. १२,७५२
👉 रवींद्रकुमार (अण्णा) जनार्दन पगारे (वंचित बहुजन आघाडी): रु. १६,६६५
👉 कय्युम कासम पटेल (आरपी): रु. १०,९३०
👉 कैलास मारुती चव्हाण (अपक्ष): रु. १०,६००
👉 गणेश बबन गिते (अपक्ष): रु. १०,३६०