एमडी उत्पादन प्रकरणाचा खटला सुरू; ललित पाटीलसह २२ आरोपींवर गुन्हा दाखल

पुणे (प्रतिनिधी): अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आरोपी असलेल्या अमली पदार्थ उत्पादन प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या खटल्याच्या सुनावणीला खेड न्यायालयात सुरुवात झाली आहे..गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यात सात ऑक्टोबर २०२० ला २० किलो मेफेड्रोन (एमडी) पकडले होते.

या गुन्ह्यात ललित पाटीलसह एकूण २२ जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ललित पाटीलसह वीस जणांवर गुन्हे दाखल असून, त्यांच्याविरोधात ऑक्टोबरमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यापैकी आठ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, तर उर्वरित बारा आरोपी अद्याप येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत अर्जातील त्रुटींची तातडीने पूर्तता करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

या खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षाने तक्रारदार पोलिस अधिकारी शकीर गोसोद्दीन जेनेडी यांची साक्ष नोंदवली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका कारमधून २० किलो मेफेड्रोन पकडले होते. त्यातून अमली पदार्थ निर्मिती व तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले. तपासादरम्यान आरोपींनी रांजणगाव येथील कंपनीत तब्बल १३२ किलो आणि रायगड जिल्ह्यातील महाड येथे दहा-पंधरा किलो एमडी तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर रडार यंत्रणेद्वारे आरटीओची कारवाई

या प्रकरणात पोलिसांनी ललित पाटीलसह एकूण २२ जणांना अटक केली होती. याच गुन्ह्यात ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे उघडकीस आले होते..या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी अमली पदार्थ जप्त करून त्यापैकी न्यायालयात सादर केलेल्या नमुन्यांचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत रासायनिक विश्लेषण केले नसल्याने अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (एनडीपीएस) तरतुदींची पूर्तता झाली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आठ आरोपींना गेल्या महिन्यात जामीन मंजूर केला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आजपासून (दि. १९) YCMOU चा 'इंद्रधनुष्य'- २२वा आंतरविद्यापीठीय युवक महोत्सव २०२६ !

पुढील सुनावणी २७ नोव्हेंबरला:
मेफेड्रोन पकडल्याची कारवाई कशी झाली. त्यावेळी कोणत्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते, यासह कारवाईचा घटनाक्रम जेनेडी यांनी साक्षीत सांगितल्याची माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील शिशीर हिरे यांनी दिली. पुढील सुनावणी २७ नोव्हेंबरला होणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790