नाशिक: शहरात थंडी; 3 दिवसांत तापमानात 3 अंशांची घट

नाशिक (प्रतिनिधी): शहरात दोन दिवसांपासून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गेल्या तीन दिवसांत तापमानात ३ अंशांची घट झाली आहे. सोमवारी (दि. ४) १७.३ अंश सेल्सिअस किमान तापमान होते ते आज, म्हणजेच शुक्रवारी (दि. ८) १४.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बीएसएनएल केबल चोरी प्रकरणात मोठा पर्दाफाश; मुंबईतून २.८८ कोटींचा मुद्देमाल जप्त, ६ अटकेत

त्यामुळे सकाळी शहरात थंडी पडली आहे. येत्या आठवडाभर वातावरण असेच राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. उत्तर भारताकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर मध्य महाराष्ट्रात थंडी वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी निफाड, ओझर आणि नाशकात कडाक्याची थंडी पडली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790