TCS प्रकरण: फॉरेन फंडिंगचा संशय; एटीएस, ‘एनआयए’शी पत्रव्यवहार

नाशिक, दि. १६ एप्रिल २०२६: शहरातील टीसीएस कार्यालयात उघडकीस आलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक व मानसिक छळासह धर्मांतराच्या कथित प्रकरणाची व्याप्ती देशाबाहेरपर्यंत आहे का, याचा पोलिसांकडून गंभीरपणे तपास सुरू आहे. संशयितांना परदेशातून आर्थिक मदत मिळाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात असून, त्यासाठी ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या अनुषंगाने दहशतवादविरोधी पथक (एटीएस) व राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

वडाळा शिवारातील व्यापारी संकुलात असलेल्या कंपनीच्या कार्यालयात काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, काही वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनीही संबंधितांना पाठीशी घातल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलिस आयुक्तालयाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले असून, ते सर्व बाजूंनी तपास करत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

या प्रकरणात धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे, तसेच कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ व अत्याचार यांसारख्या एकूण नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. एका पीडितेने बलात्काराचा आरोप केला असून, चार महिलांनी लैंगिक छळाच्या तक्रारी दिल्या आहेत. इतर तक्रारींमध्ये मानसिक छळ व धार्मिक भावना दुखावल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच एका पुरुषानेही धर्मांतरासाठी दबाव आणल्याची फिर्याद नोंदवली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

आतापर्यंत या प्रकरणात नऊ आरोपींची नोंद झाली असून, त्यात सात पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. सर्व पुरुष आरोपी एकमेकांचे सहआरोपी असल्याचे समोर आले आहे. यातील एक पुरुष आणि एक महिला संशयित फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

प्राथमिक तपासानुसार, कंपनीतील काही उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांनी एकत्र येत संघटित गट तयार करून महिलांविरोधात गैरवर्तन, अश्लील कृत्ये, तसेच मानसिक आणि लैंगिक छळ केल्याचे दिसून आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790