नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावर ‘इतक्या’ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई आग्रा महामार्गावर दहावा मैल परिसरात १८ लाख ३२ हजार रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा व कंटेनर असा एकुण ३८ लाख ३२ हजार ९६४ चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे आदेशानुसार जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी विशेष पथकांची कारवाई सुरु आहे.

२८ डिसेंबर रोजी स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा कंटेनर पकडण्यात आला आहे.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, काही इसम एका बंद कंटेनर मध्ये विदेशी मद्याचा साठा भरून अवैधरित्या मुंबई आग्रा महामार्गाने जात असल्याची माहीती मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी १० वा मैल परिसरात सापळा रचून नाशिक बाजूकडे जाणारा कंटेनर क्रं NL-01-N-7630 थांबविला.

सदर कंटेनरची झडती घेतली असता त्यात रॉयल चॅलेंज, मॅकडोवेल्स नंबर १, ट्यूबर्ग बिअर असे पंजाब राज्य उत्पादन असलेले विदेशी मद्याचे एकूण ५७१ बॉक्स असा एकूण १८ लाख ३२ हजार ९६४ रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा मिळून आला.

सदरचे विदेशी मद्य पंजाब राज्याव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये विक्री करण्यास मनाई असून देखील यातील इसम हे बनावट इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे बिल तयार करून, शासनाचा महसूल चुकवून, शासनाची फसवणूक करून अवैधरित्या विदेशी मद्यसाठा कोठेतरी विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशीर रित्या वाहतूक करताना मिळून आल्याने कंटेनर मालक मोहन कनाराम लाल, रा दांतीवास, जिल्हा जालोर, राजस्थान व कंटेनर वरील पळून गेलेला चालक व त्याचे इतर साथीदार यांचे विरुद्ध ओझर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात विदेशी मद्याचा एकुण १८ लाख ३२ हजार रुपये चा अवैध मद्यसाठा व कंटेनर असा एकुण ३८ लाख ३२ हजार ९६४ चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील., सपोनि सागर कोते, सपोनि गणेश शिंदे., पोउपनिरीक्षक दत्ता कांभीरे, पो उपनिरीक्षक नाना शिरोळे, ASI शिवाजी ठोंबरे, पोहवा नवनाथ सानप, शांताराम घुगे, सतीश जगताप, मनोज सानप यांचे पथकाने कामगिरी केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790