वंदे भारत ट्रेन: नाशिकहून मुंबईसाठी ५८५ पासून १300 पर्यंत तिकीट

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी):  जालना- सीएसटी मुंबई सुपरफास्ट वंदे भारत ट्रेन नियमितपणे १ जानेवारीपासून अधिकृतपणे सुरू होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर केले. नाशिकहून मुंबईसाठी विविध क्लाससाठी ५८५ पासून १३०० रुपयांपर्यंत तिकीट आहे. गाडीला ८ कोच असून त्यात डीटीसी २, एमसी ४ तर टीसीचे २ राहतील. आरक्षण शनिवारी दुपारी २ पासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर व पीआरसी लोकेशनवर सुरू होईल.

एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी केटरिंगसह जालन्यापासून भाडे पुढीलप्रमाणे:
औरंगाबाद ८२० रूपये, मनमाड ११२५, नाशिकरोड १५२५, कल्याण १९६५, ठाणे २०२५, दादर २०९०, सीएसएमटी २१२५. नाशिकहून कल्याण १११०, ठाणे ११७५, दादर १२६५ आणि सीएसएमटीसाठी १३०० रूपये.

सर्वसाधारण सीसी क्लाससाठी भाडे केटरिंग चार्जेससह जालन्याहून पुढीलप्रमाणे:
औरंगाबाद ४३५, मनमाड ५८०, नाशिक ८२५ कल्याण १०४५, ठाणे १०७५ दादर ११०० आणि सीएसएमटी ११२०.

नाशिकहून मुंबईला जनरल सीसी क्लाससाठी ७०५ रुपये तिकिट:
नाशिकहून कल्याण ६१०, ठाणे ६४५, दादर ६९० तर सीएसएमटी ७०५ रूपये राहिल.

केटरिंग व्यतिरिक्त जालन्यापासून भाडे पुढीलप्रमाणे:
सर्वसाधारण सीसीसाठी जालना ते औरंगाबाद ४२०, मनमाड ५६५, नाशिक ६८५, कल्याण ९१०, ठाणे ९४०, दादर ९६५, सीएसएमटी ९८५ तर नाशिकहून कल्याण ४९०, ठाणे ५२५, दादर ५६५, सीएसएमटी ५८५ असे राहिल.

एक्झीक्युटीव्ह क्लाससाठी केटरिंग व्यतिरिक्त जालन्यापासून भाडे पुढीलप्रमाणे:
जालना ते औरंगाबाद ८०५, मनमाड १११०, नाशिक १३५५, कल्याण १७९५, ठाणे १८५५, दादर १९२०, सीएसएमटी १९५५ तर नाशिकहून कल्याण ९५५, ठाणे १०२०, दादर १११०, सीएसएमटी ११४५ असे राहिल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790