नाशिक: मुख्य टपाल कार्यालयासह पाच ठिकाणी आजपासून (दि. ८) समर्पित आधार सेवा केंद्र सुरू

नाशिक। दि. ८ मे २०२६: नाशिक विभागातील नागरिकांना आधार नोंदणी व अद्ययावत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक विभागाच्या टपाल खात्यांतर्गत पाच टपाल कार्यालयांमध्ये समर्पित आधार सेवा केंद्रे शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी सुरू करण्यात येणार आहेत. टपाल विभागाचे वरीष्ठ अधीक्षक प्रफुल्ल आर. वाणी यांनी ही माहिती दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना अटक; सहा गुन्ह्यांची उकल, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

टपाल कार्यालयांची नावे व त्यांची वेळ अशी: नाशिक मुख्य टपाल कार्यालय, नाशिक रोड मुख्य टपाल कार्यालय- सकाळी १० ते सायंकाळी ५. पंचवटी टपाल कार्यालय, सिडको कॉलनी टपाल कार्यालय- सकाळी ९ ते दुपारी ४, सिन्नर टपाल कार्यालय- सकाळी ८ ते दुपारी ३.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नऊ हजार रुपयांच्या उसनवारीच्या वादातून युवकाची हत्या; आरोपीला १२ तासांत अटक

या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना नवीन आधार नोंदणी, पत्ता बदल, मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे आदी सुविधा उपलब्ध होतील. नागरिकांनी या केंद्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरीष्ठ अधीक्षक श्री. वाणी यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790