नाशिक: द्वारका चौकात भूमिगत वाहिनीत बिघाड; दुरुस्तीसाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत !

नाशिक (प्रतिनिधी): महावितरणच्या नाशिक शहर विभागातील इंदिरानगर आणि गोविंदनगर या ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राला महापारेषणच्या १३२ केव्ही टाकळी विद्युत उपकेंद्र येथून विद्युत पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही भूमिगत केबल वाहिन्या मधील केबल मध्ये द्वारका चौक जवळ आज (दि. १३ मार्च २०२५) गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता तांत्रिक बिघाड होवून नादुरुस्त झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

त्यामुळे गोविंदनगर या विद्युत उपकेंद्र चा वीजपुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. मात्र सध्या गोविंद नगर या विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या विद्युत वाहिन्यांचा पुरवठा इतर वाहिन्यांवरून बॅकफिडींगद्वारे सुरू करण्यात आला आहे.

इंदिरानगर मधील शिवाजीनगर विद्युत उपकेंद्रातील मानवता आणि कल्पतरूनगर या 11 केव्ही विद्युत वाहिन्या दुसऱ्या उपकेंद्रातील फिडरवरून बॅक फीडिंग घेऊन सुरळीत केलेला आहे. तसेच भारतनगर, शनिमंदिर व दीपाली नगर या वाहिन्यांचा काही भाग सुरू करण्यात आलेला आहे. अशोका मार्ग, भारतनगर व दीपाली नगर भागातील काही भाग बंद आहे. सदर भाग पूर्ववत पूर्वक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

द्वारका चौकात केबल दुरुस्तीचे काम सुरू असून दुरुस्तीसाठी आणखी तीन ते चार तास वेळ लागण्याची शक्यता आहे.
नाशिक शहर विभाग २ चे कार्यकारी अभियंता जगदीश जाधव, व्दारका उपविभाग चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे, इंदिरानगर कक्षचे सहाय्यक अभियंता श्री सोनार हे तंत्रज्ञ यांच्यासह दुरुस्तीच्या ठिकाणी यावेळी उपस्थित आहेत. नादुरुस्त वाहिनीवरील बहुतांश भाग दुसऱ्या वाहिनीवरील वीज पुरवठा वळता करून सुरू करण्यासोबतच उर्वरित भाग पुर्ववत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790