नाशिक : सिंहस्थासाठी महावितरण सज्ज; चार नवीन उपकेंद्रांतून मिळणार अखंडित वीजपुरवठा

नाशिक। दि. २८ जून २०२६| आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांसह स्थानिक नागरिकांना २४ तास अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महावितरणने व्यापक तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणचे संचालक (संचलन) धनंजय औंढेकर यांनी नाशिकमध्ये आढावा बैठक घेत विविध विकासकामांचा आढावा घेतला तसेच भद्रकाली विद्युत उपकेंद्रासह शाही मार्ग आणि रामकुंड परिसरातील सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेत उपाययोजना व उत्पन्नवाढीवर भर द्यावा- व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे

कुंभमेळा काळात वीजपुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी सर्व कामे उच्च दर्जाची, कालबद्ध आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश औंढेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रत्येक स्तरावरील जबाबदाऱ्या स्पष्ट करून तांत्रिक बिघाड झाल्यास तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अत्याधुनिक पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.. कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या...

कुंभमेळ्यासाठी गोदापार्क, भद्रकाली, नांदूर-मानूर आणि तळवाडे येथे ३३/११ केव्ही क्षमतेची चार नवीन अत्याधुनिक विद्युत उपकेंद्रे उभारण्यात येत असून, त्यामधून भाविकांच्या वाढत्या वीज गरजा पूर्ण केल्या जाणार आहेत.

याशिवाय संपूर्ण परिसरातील वीजपुरवठ्यावर सतत देखरेख ठेवण्यासाठी २४x७ विशेष नियंत्रण कक्ष आणि फिरती दुरुस्ती पथके कार्यरत केली जाणार आहेत. गर्दीच्या काळात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, साहित्य आणि तांत्रिक साधनसामग्री उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महाडीबीटी 2.0 प्रणालीवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी महाआयडी तयार करावा

या बैठकीला नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्यासह महावितरणचे वरिष्ठ अभियंते आणि अधिकारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790