नाशिक: गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! ई-केवायसीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

नाशिक। दि. २८ ऑगस्ट २०२६: एलपीजी गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवण्यात आली असून आता ग्राहकांना ३१ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. यापूर्वी ई-केवायसीसाठी १६ ऑगस्ट आणि त्यानंतर २३ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वाहन मालकांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रियेनंतरच हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

निर्धारित मुदतीत ई-केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन तातडीने रद्द केले जाईल, असे नाही. मात्र, ग्राहकांना घरगुती दराने सिलिंडर मिळणे, गॅस बुकिंग तसेच सिलिंडरच्या डिलिव्हरीमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. पात्र ग्राहकांच्या अनुदानाच्या लाभावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे ग्राहकांनी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा न करता लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: २८ ऑगस्टला होणाऱ्या ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन; प्रवेश विनामूल्य

घरबसल्या ई-केवायसीची सुविधा:
ग्राहकांना संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत मोबाइल अॅपद्वारे घरबसल्या ई-केवायसी करता येणार आहे. इंडेन ग्राहकांसाठी Indian Oil ONE, भारत गॅस ग्राहकांसाठी Hello BPCL, तर एचपी गॅस ग्राहकांसाठी HP Pay या अॅपचा वापर करता येईल.

याशिवाय ग्राहक आपल्या एलपीजी वितरकाकडे जाऊन बायोमेट्रिक पडताळणीद्वारे ई-केवायसी पूर्ण करू शकतात. ही प्रक्रिया काही सेकंदांत पूर्ण होत असल्याने ग्राहकांचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचतो. तसेच सिलिंडरची डिलिव्हरी घेताना डिलिव्हरी कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या फेस स्कॅन सुविधेच्या माध्यमातूनही ई-केवायसी पूर्ण करण्याची सोय उपलब्ध आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790