नाशिक: घंटागाडीचे ब्रेक फेल झाल्याने अपघात; 2 चारचाकीचे नुकसान

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): रोकडोबा परिसरातील असराची वेस येथे घंटागाडीचे ब्रेक फेल झाल्याने अपघात घडला. अपघातात दोन चारचाकीचे नुकसान झाले आहे.

तसेच, दुचाकीवर थांबलेले दोघे थोडक्यात बचावले. काही वेस परिसरात धावपळ उडाली होती.

हे ही वाचा:  नाशिक: विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून मनपा-महावितरणमध्ये दावे-प्रतिदावे

नितीन पवार यांनी त्यांची चारचाकी (एमएच- १५- जीए- ७६७३) असराची वेस येथील गणपती मंदिर शेजारी उभी केलेली होती. शनिवार (ता. ३०) दुपारी महापालिका घंटागाडी (एमएच- १५- एफक्यू- ०१८९) जात असताना ब्रेक फेल झाले.

हे ही वाचा:  नाशिक: बंद बंगला, व रो हाऊसचे लॉक तोडून घरफोडी; साडेसात लाखांचा ऐवज लंपास

घंटागाडी श्री. पवार यांच्या चारचाकीसह शेजारी उभी असलेल्या चारचाकीला (एमएच- ०१- बीयू- ७६३८) जाऊन धडकली.

अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, दुचाकी घेऊन उभे असलेल्या दोघांच्या वेळीच लक्षात आल्याने ते बचावले.

अचानक ब्रेक फेल झाल्याने परिसरात धावपळ उडाली. सुदैवाने रस्त्यावर अन्य कोणी नसल्याने जीवितहानी घडली नाही. इतर वेळी मुख्य रस्ता असल्याने नेहमी वर्दळ असते. पवार यांनी घडलेल्या प्रकाराबाबत भद्रकाली पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790