नाशिक: आजपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन

नाशिक। दि. १० एप्रिल २०२६: शिक्षण संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अकरावी प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून (दि. १०) सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाइन अर्जाचा पहिला भाग भरता येणार असून, दुसरा भाग दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भरता येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कार झाडावर आदळल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू; दहा जण जखमी

राज्य मंडळाची दहावी परीक्षा फेब्रुवारी ते मार्चदरम्यान पार पडली असून, निकाल मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे. गतवर्षी कागदपत्रांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मारहाण करून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच जण ताब्यात

प्रवेशासाठी उपलब्ध जागा:
विज्ञान: ३४,७६०
वाणिज्य: १८,२००
कला: ३४,२००
संयुक्त: २,०००

आवश्यक कागदपत्रे:
दहावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर, आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र व अनाथ विद्यार्थ्यांसाठी संबंधित विभागाचे प्रमाणपत्र.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790