‘स्वामी आहे उभा’ भक्तिगीत रसिकांच्या भेटीला; स्वामी समर्थांच्या भक्तीचा जागवला सुरेल आविष्कार

नाशिक। दि. २९ जून २०२६: स्वामी समर्थांच्या भक्तिभावाला सुरेल अभिव्यक्ती देणारे ‘स्वामी आहे उभा’ हे नवीन भक्तिगीत नुकतेच ‘गजर देवाचा’ या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे. स्वामी समर्थांप्रती श्रद्धा, विश्वास आणि समर्पणाचा संदेश देणारे हे गीत अल्पावधीतच भक्तांच्या पसंतीस उतरले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १५ सप्टेंबर रोजी त्रैमासिक बैठक

या भक्तिगीताची निर्मिती आकाश आरगडे यांनी केली असून, सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी आपल्या भावस्पर्शी आवाजातून गीताला साज चढवला आहे. संगीतकार सर्वेश साबळे यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. भक्तिमय शब्दरचना, सुरेल संगीत आणि प्रभावी गायन यांचा सुंदर संगम या गीतातून अनुभवायला मिळतो.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई

प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर या गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक स्वामीभक्तांनी हे गीत ऐकल्यानंतर मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि स्वामी समर्थांप्रती अधिक दृढ भक्तिभाव जागृत झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

निर्मात्यांच्या मते, हे गीत केवळ एक भक्तिगीत नसून स्वामी समर्थांच्या चरणी अढळ श्रद्धा आणि समर्पण व्यक्त करणारा आध्यात्मिक अनुभव आहे. त्यामुळे प्रत्येक स्वामीभक्ताने हे गीत ऐकून भक्तिरसाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत मंगळवारी (दि. २५) वीजपुरवठा बंद राहणार !

हे भक्तिगीत ‘गजर देवाचा’ या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असून, अधिकाधिक स्वामीभक्तांपर्यंत हा भक्तिसंदेश पोहोचावा यासाठी गीताला भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन निर्मात्यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790