नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २६ हजार ०४९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ५ हजार १८७ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ८१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण: नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३००, चांदवड ३८, सिन्नर २५१, दिंडोरी ४५, निफाड ३३१, देवळा ५६, नांदगांव १३०, येवला ४६, त्र्यंबकेश्वर १३, सुरगाणा ००, पेठ ०२, कळवण ०७, बागलाण २०३, इगतपुरी ८३, मालेगांव ग्रामीण १३३ असे एकूण १ हजार ६३८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ८३५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ७०५ तर जिल्ह्याबाहेरील ०९ असे एकूण ५ हजार १८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३२ हजार ०४९ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७८.३८, टक्के, नाशिक शहरात ८४.४३ टक्के, मालेगाव मध्ये ६६.४४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.९५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८१.५९ इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण २२३, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४६१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १०७ व जिल्हा बाहेरील २२ अशा एकूण ८१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
(वरील आकडेवारी आज दि. २७ ऑगस्ट) सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)