जिल्ह्यात आजपर्यंत ८९ हजार २१६ रुग्ण कोरोनामुक्त; ३ हजार ४१७ रुग्णांवर उपचार

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ८९ हजार २१६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ३ हजार ४१७ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये १४७ ने घट झाली आहे.  आत्तापर्यंत १ हजार ६७९  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ११४, चांदवड २८, सिन्नर ३१९,दिंडोरी १०८, निफाड १९१, देवळा ०९, नांदगांव ७४, येवला ११, त्र्यंबकेश्वर २०, सुरगाणा ०४, पेठ ०१, कळवण ०६,  बागलाण ३८, इगतपुरी २६, मालेगांव ग्रामीण ५४ असे एकूण १  हजार ०३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार २८९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ११६  तर जिल्ह्याबाहेरील ०९ असे एकूण ३  हजार ४१७  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ९४ हजार ३१२ रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चावर राहणार निवडणूक आयोगाची नजर

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९४.०४,  टक्के, नाशिक शहरात ९४.९४  टक्के, मालेगाव मध्ये  ९३.२२  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.४६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.६० इतके आहे.

कोरोनामुळे झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ६०६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ८६९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६६  व जिल्हा बाहेरील ३८  अशा एकूण १ हजार ६७९  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चावर राहणार निवडणूक आयोगाची नजर

(वरील आकडेवारी आज दि. ११ नोव्हेंबर २०२० सकाळी ११.३० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790