नाशिक: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार

नाशिक। दि. ८ ऑक्टोबर २०२५: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक), डॉ. पवन दत्ता (इगतपुरी), उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे (प्रशासन), उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आव्हाड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी विक्रमकुमार, तहसीलदार पंकज पवार, वैशाली आव्हाड, उषाराणी देवगुणे, मंजुषा घाटगे, आबासाहेब तांबे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: शहरातील खड्डयांप्रश्नी सत्कार्य फाउंडेशनचे ठिय्या आंदोलन !

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत प्रशासनाची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, कोणतेही काम प्रलंबित ठेवू नका. गतिमान आणि पारदर्शी कारभार ठेवावा. वेळेत सर्व कामे मार्गी लावावीत. ई- ऑफिसचा वापर करावा. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेने शहरातील १८ अवैध होर्डिंग्ज, ११ जाहिरातींचे फलक काढले

श्री. प्रसाद हे अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१५ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी धाराशिव येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी, घोडेगाव (जि. पुणे) येथे आदिवासी विकास विभाागाचे प्रकल्प अधिकारी, अकोला आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जळगाव येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790