नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक: आरक्षण सोडतीसह व तत्सम कामकाजासाठी अधिकारी प्राधिकृत

नाशिक| दि. 7 ऑक्टोबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): राज्य निवडणूक आयोगाने 3 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आदेशान्वये नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक (आरक्षण) ओदश, 2025 निर्गमित केले आहेत.

या आदेशातील परिच्छेद क्रमांक 2 अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 10 (1) (ब) मधील तरतुदीनुसार सदस्य आरक्षण निश्चित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार 16 जून 2025 रोजीच्या आदेशान्वये संबंधित विभागीय आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहेत.

⚡ हे ही वाचा:  सोने तारण न ठेवताच वित्तीय संस्थेला आठ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी पती-पत्नीविरोधात गुन्हा

आदेशातील परिच्छेद क्रमांक 2 (1) अन्वये जिल्हाधिकारी यांनी सर्व नगरपरिषदांकरिता आरक्षण सोडत व तत्सम कामकाजासाठी उपजिल्हाधिकारी यांच्यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, असे नमूद आहे.

मा. सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे 3 ऑक्टोबर 2025 अन्वये नगरपरिषद/ नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुक आरक्षण सोडत कार्यक्रम निर्गमित केला आहे. प्रारूप आरक्षणाची सोडत काढण्याचा कालावधी दिनाक 8 ऑक्टोबर 2025 पर्यंत करणे आवश्यक असल्याने त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत व तत्सम कामासाठी खालील अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. प्राधिकृत अधिकारी व मुख्याधिकारी संबंधित नगरपरिषदांनी 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता संबंधित नगरपरिषदेच्या सभागृहात आदेशातील तरतुदींचे काटेकोर व तंतोतंत पालन करून मुदतीत नागरिकांसमक्ष आरक्षण सोडत काढण्याची कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आदेशित केले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये तापमानात घसरण; हिवाळ्याची चाहूल जाणवू लागली...!

असे आहेत नगरपरिषद निहाय प्राधिकृत अधिकारी:

  1. येवला नगरपरिषद- उपविभागीय अधिकारी ,येवला
  2. मनमाड नगरपरिषद- उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), ल.पा.नाशिक
  3. सिन्नर नगरपरिषद- उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) पाटबंधारे क्रमांक 1, नाशिक
  4. ओझर नगरपरिषद- उपविभागीय अधिकारी, दिंडोरी
  5. पिंपळगाव बसंवत नगरपरिषद- उपविभागीय अधिकारी, निफाड
  6. इगतपुरी न‍गरपरिषद- उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्रमांक 2, नाशिक
  7. त्र्यंबक नगरपरिषद- उपविभागीय अधिकारी , इगतपुरी-त्र्यंबकेश्वर
  8. नांदगाव नगरपरिषद- उपविभागीय अधिकारी, मालेगाव
  9. सटाणा नगरपरिषद- उपविभागीय अधिकारी, बागलाण
  10. भगूर नगरपरिषद- उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), वै.त.प्र, नाशिक
  11. चांदवड नगरपरिषद- उपविभागीय अधिकारी, चांदवड

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here