Amazon

नाशिक: 23 मे रोजी गोळीबार प्रात्यक्षिके; सी सेक्टरमधील प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांना जाण्यास सक्त मनाई

नाशिक, दि. 19 मे, 2025: जनरल स्टाफ ऑफिसर, मुख्यालय तोफखाना, देवळाली कॅम्प आर्टिलरी स्कूल तर्फे नाशिक व इगतपुरी तालुक्यातील सी सेक्टर या ठिकाणी गुरूवार 23 मे 2025 रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 या कालावधीत गोळीबाराची प्रात्याक्षिके केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात नागरिकांनी प्रवेश करू नये, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांच्या ताब्यात

नाशिक व इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे, नांदूरवैद्य, दाढेगाव, शिगवे बहुला, वडनेर, पिंपळगाव खांब या गावांच्या मुलकी हद्दीतील काही भाग तोफांच्या माऱ्याच्या रेषेत येतो. हा विशिष्ट भाग कोणता आहे, याबाबत संबंधित गावांना दवंडीद्वारे सूचित करण्यात आले आहे.त्यामुळे गोळीबार प्रात्याक्षिकाच्या दिवशी व त्या वेळी धोक्याच्या हद्दीत नागरिकांना प्रवेश करण्यास व या भागात जानावरे पाठविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एफडीएकडून ४८ लाखांचा फ्राइड कांदा आणि तेलाचा साठा जप्त

प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रात प्रवेश केल्यास प्राण धोक्यात येऊन हानी झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहणार नाही. सदर सूचनेचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही अपर जिल्हादंडाधिकारी वाघ यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790