नाशिक। दि. ३ नोव्हेंबर २०२५: केंद्र सरकारच्या पेंशन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाचे सहसचिव दीपक गुप्ता यांच्या उपस्थितीत सोमवार 3 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता इगतपुरी माहेश्वरी मंगल कार्यालयात राष्ट्रीय डिजिटल लाइफ सर्टिफिकेट शिबिर 4.0 मध्ये सहभागी होणार आहेत.
या मोहिमेचा उद्देश देशभरातील पेन्शनधारकांना डिजिटल पद्धतीने लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आणि या सुविधेबाबत जागृती निर्माण करणे हा आहे.
सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे पेन्शनधारकांना बँका किंवा कार्यालयांत प्रत्यक्ष जाऊन प्रमाणपत्र सादर करण्याची गरज कमी होईल व प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल.
या प्रसंगी स्थानिक प्रशासन, बँक अधिकारी, पेन्शनधारक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
![]()


