संभाव्य गर्दीमुळे ५ नोव्हेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वरला व्हीआयपी दर्शन बंद

नाशिक। दि. ३ नोव्हेंबर २०२५: ज्योतिलींग श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात ५ नोव्हेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे.

कार्तिक पौर्णिमा बुधवारी (दि. ५) रोजी असून ज्योतिलींग श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेऊन प्रशासनावर वाढणारा ताण, तसेच निर्माण होणाऱ्या अडचणींचा विचार करून श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या स्तरावरून अथवा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राजशिष्टाचारसंबंधी लेखी पत्रव्यवहार असलेल्या भाविकांना मात्र यातून वगळण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790