नाशिक: उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे २४ एप्रिल रोजी आयोजन

नाशिक। दि. २२ एप्रिल २०२६: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने युवक व युवतींसाठी बारा दिवसांच्या कालावधीचे उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून नवउद्योजकांना उद्योग-व्यवसायासाठी आवश्यक कौशल्ये, मार्गदर्शन व शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, सातपूर, आयटीआय जवळ, नाशिक येथे उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना शासकीय कर्ज योजना, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या संधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्टार्टअप व स्टँड-अप इंडिया, क्लस्टर डेव्हलपमेंट आदी योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच उत्पादन किंमत निर्धारण, हिशोब पद्धती, उद्योग नोंदणी प्रमाणपत्र, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग निवड, प्रकल्प अहवाल तयार करणे, बाजार सर्वेक्षण, मार्केटींग, ई-टेंडर, जेम पोर्टल नोंदणी, आर.पी.आर/ ट्रेडमार्क या विषयांवर तज्ज्ञाद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय डिजिटल मार्केटिंग, जीएसटी, उद्योगांना प्रत्यक्ष भेट, आर्थिक व्यवस्थापन यासंबंधीही माहिती देण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

या प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे असून किमान इयत्ता आठवी उत्तीर्ण उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहे. अधिम माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, नाशिक यांच्या 9168667167, 8788557530 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790