नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 22 मे रोजी आयोजन

नाशिक। दि. १९ मे २०२६: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मार्फत शुक्रवार 22 मे 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक या ठिकाणी ‘शिका आणि कमवा’ या उपक्रमांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात टोयोटो किर्लोस्कर मोटरच्या शिका व कमवा उपक्रमांतर्गत 50 विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. टोयोटो किर्लोस्कर मोटरचे एच.आर. मॅनेजर व प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग यांच्या सहकार्याने उमेदवारांना जागतिक दर्जाचे निवासी तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

या प्रशिक्षण कार्यक्रमात ऑटोमोटिव्ह वेल्ड टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह पेंट टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह असेंम्ब्ली टेक्निशियन आणि मेकॅट्रॉनिक्स टेक्निशियन यासारखे विविध तांत्रिक कोर्सेस उपलब्ध आहेत. या प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्षांचा असून प्रशिक्षण दरम्यान पहिल्या वर्षी रूपये 15 हजार 800 आणि दुसऱ्या वर्षी रूपये 17 हजार सहाशे विद्यावेतन दिले जाणार आहे. यासोबतच उमेदवारांची निवास सुविधा, संगणक कक्ष, क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यांनतर गुणवत्तेच्या आधारे संबंधित कंपनीत नोकरीची संधी मिळणार आहे. प्रशिक्षणासाठी 18 ते 21 वर्षे वयोगटातील इयत्ता 10 वी, 12 वी व बीकॉम उत्तीर्ण उमेदवार पात्र असून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांका

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790