नाशिक: पेन्शनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्राची घरपोच सुविधा

नाशिक। दि. १८ नोव्हेंबर २०२६: पेन्शनधारकांची सुविधा वाढविण्यासह डिजिटल सेवांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने डाक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (IPPB) माध्यमातून देशभरात डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान 5.0 राबविण्यात येत आहे.

भारत सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागामार्फत ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने पेन्शनधारकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्राची घरपोच सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार; कुटुंबीयांना जीवे मारण्याचीही धमकी

या अभियानांतर्गत देशभरातील पेन्शनधारकांना आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन (चेहरा प्रमाणीकरण) तसेच फिंगरप्रिंट बायोमेट्रिक प्रमाणीकरणाच्या माध्यमातून डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना घरबसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य होणार आहे. तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO-EPS-95) पेन्शनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची सुविधा पूर्णतः विनामूल्य उपलब्ध आहे.

तसेच दूरसंचार विभागाच्या (DoT) आणि संरक्षण विभागाच्या (CGDA/DAD) पेन्शनधारकांनाही ही सुविधा विनामूल्य देण्यात येणार आहे. इतर सर्व पात्र पेन्शनधारकांना केवळ ७० रुपये (जीएसटीसह) नाममात्र सेवा शुल्क आकारून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीसह ४ तालुके दुष्काळग्रस्त; अन्य तालुक्यांचे सर्वेसक्षण

पेन्शनधारकांना ही सुविधा देशभरातील डाक कार्यालयांमध्ये तसेच पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय विशेष डिजिटल जीवन प्रमाणपत्र (DLC) शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी संबंधित पेन्शन वितरण कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गॅस कनेक्शन कामाच्या बहाण्याने युवतीचा विनयभंग

विशेषतः ज्येष्ठ नागरिक, अतिज्येष्ठ नागरिक, हालचालींवर मर्यादा असलेल्या व्यक्ती तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या पेन्शनधारकांसाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरणार आहे. देशव्यापी डाक नेटवर्कच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचविण्याची क्षमता वापरून डाक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक सर्वसमावेशक, सुलभ आणि नागरिककेंद्रित सेवा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790