नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ २५ नोव्हेंबरला मॉक ड्रिल

नाशिक। दि. १८ नोव्हेंबर २०२६: आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी, या उद्देशाने उप नियंत्रक, नागरी संरक्षण, नाशिक कार्यालयामार्फत २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे, असे नागरी संरक्षण कार्यालयाचे उप नियंत्रक दे.इं. बावस्कर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अनधिकृत होर्डिंग्जविरोधात आजपासून मनपाची धडक कारवाई; थेट गुन्हे दाखल होणार

नागरी संरक्षण संचालनालयाचे उपसंचालक यांच्या पत्रानुसार तसेच जिल्हा दंडाधिकारी व नियंत्रक, नागरी संरक्षण, नाशिक यांच्या मान्यतेने उप नियंत्रक, नागरी संरक्षण, नाशिक कार्यालयामार्फत ही मॉक ड्रिल आयोजित करण्यात येणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790