नाशिक। दि. १६ जुलै २०२६: केंद्र सरकार संचालित पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, खेडगाव, ता.दिंडोरी, नाशिक येथील इयत्ता 6 वीच्या सन 2027-28 प्रवेशाकरीता होणाऱ्या निवड चाचणीसाठी परीक्षा शनिवार 28 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित केली आहे. ही परीक्षा नाशिक जिल्ह्यातील 40 परीक्षा केंद्रांवर होणार आहे. विद्यार्थ्यांनी निवड चाचणी परीक्षेसाठी 31 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्राचार्य एस. व्ही. स्वामी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
परीक्षेसाठी विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असावेत. सन 2026-27 या शैक्षणिक सत्रात इयत्ता पाचवी मध्ये नाशिक जिल्ह्यातील शासनमान्य शाळेत शिकत असावेत व त्यांची जन्मतारीख 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 दरम्यान असावी. विद्यार्थी इयत्ता नियमित इयत्ता तिसरी व चौथी उत्तीर्ण झालेले असावेत. विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा-2027 आवेदनपत्र भरण्यासाठी संपूर्ण माहिती नवोदय विद्यालय समिती, नवी दिल्ली च्या www.navodaya.gov.in, किंवा नवोदय विद्यालय समिती क्षेत्रिय कार्यालय, पुणे च्या https://cbseitms.rcil.gov.in/nvs संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असेही प्राचार्य श्री. स्वामी यांनी कळविले आहे.
![]()


