नाशिक: गॅस कनेक्शन शुल्क भरण्याच्या बहाण्याने ऑनलाइन फसवणूक; नागरिकाला अडीच लाखांचा गंडा

नाशिक। दि. १६ जुलै २०२६ : पाथर्डी फाटा परिसरातील एका नागरिकाची एमएनजीएल गॅस कनेक्शनचे शुल्क भरण्यास मदत करण्याचा बहाणा करून तब्बल २ लाख ४८ हजार २२१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोरख गारे (वय ४२, रा. पाथर्डी फाटा) यांना मागील महिन्यात एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. एमएनजीएल गॅस कनेक्शनचे शुल्क ऑनलाइन भरण्यास मदत करण्याच्या नावाखाली संबंधिताने त्यांचा विश्वास संपादन केला.

यानंतर आरोपीने मोबाईलच्या माध्यमातून फिर्यादीचे बँकेचे क्रेडिट कार्ड सक्रिय करून त्याचा गैरवापर केला. त्याद्वारे विविध ऑनलाइन व्यवहार करत २ लाख ४८ हजार २२१ रुपये परस्पर काढून घेत आर्थिक फसवणूक केली.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

फसवणुकीची बाब लक्षात येताच गोरख गारे यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास इंदिरानगर पोलिस करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790