Amazon

नाशिक: स्कूल ऑफ आर्टिलरीतर्फे 18 सप्टेंबर रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके

नाशिक। दि. १५ सप्टेंबर २०२६: जनरल स्टाफ ऑफीसर, मुख्यालय, तोफखाना (स्कूल ऑफ आर्टिलरी), देवळाली कॅम्प यांच्यातर्फे अधिसूचित ‘सी’ (C) सेक्टरमध्ये १८ सप्टेंबर, २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपयंत जीवंत दारुगोळयाचा वापर करून तोफखान्याची व मैदानी गोळीबाराची प्रात्यक्षिके (Field Firing and Artillery Practice) केली जाणार आहेत. या गोळीबाराच्या सरावामुळे नाशिक तालुक्यातील गावांच्या महसुली हद्दीतील काही भाग तोफांच्या मारा रेषेत येत आहे. या गावातील ग्रामस्थांनी या परिसरात जाऊ नये, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात आठ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

नाशिक तालुक्यातील दाडेगांव, शिंगवे बहुला, वडनेर, पिंपळगाव खाम या महसुली गावांच्या हद्दीतील काही भाग तोफांच्या माऱा रेषेत येत आहेत. युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना यांचा सराव अधिनियम,१९३८ च्या कलम १० (२) अन्वये मिळालेल्या अधिकारानुसार, वरील दिवशी आणि ठरवलेल्या वेळी (१८ मे २०२६, स. ८. ते दु. १६.), कोणत्याही व्यक्तीने सदर धोक्याच्या हद्दीत प्रवेश करू नये, कोणास जाऊ देऊ नये तसेच आपली पाळीव जनावरे त्या क्षेत्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कुंभमेळ्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणची गतिमानता; दोन केबल टेस्टिंग व्हॅनचे लोकार्पण

या प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना प्रवेश केल्यास किंवा संबंधित व्यक्तीविरुध्द कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल (कलम १२ नुसार दंडनीय अपराध). तसेच नियम मोडून प्रवेश केल्यामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी शासनावर राहणार नाही, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही अपर जिल्हादंडाधिकारी श्री. राजपूत यांनी म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790