Amazon

नाशिक: कुंभमेळ्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणची गतिमानता; दोन केबल टेस्टिंग व्हॅनचे लोकार्पण

नाशिक। दि. ०५ नोव्हेंबर २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने वीज सेवा अधिक गतिमान करण्यासाठी अत्याधुनिक अंडरग्राउंड केबल टेस्टिंग व्हॅन सज्ज केली आहे. या दोन नवीन केबल टेस्टिंग व्हॅनचे फित कापून लोकार्पण नाशिक चाचणी विभागीय कार्यालय, सातपूर येथे आज बुधवारी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महावितरण नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “महावितरणने वेळेआधीच केलेली तयारी कौतुकास्पद आहे. या आधुनिक यंत्रणेमुळे कुंभमेळा काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत मिळणार आहे.”

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याचे अधिकृत संकेतस्थळ भाविकांसाठी खुले; नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या तयारीची माहिती एका क्लिकवर!

मुख्य अभियंता सुंदर लटपटे म्हणाले, ” अखंडित व सुरळीत वीज पुरवठ्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भूमिगत केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास ते शोधून दुरुस्त करण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.” यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी केबल टेस्टिंग व्हॅनच्या आत मध्ये जाऊन पाहणी केली व कार्यपद्धती समजून घेतली.

काय आहे ही केबल टेस्टिंग व्हॅन?
ही व्हॅन म्हणजे जमिनीखालून गेलेल्या भूमिगत वीज वाहक केबल्समधील बिघाड शोधण्यासाठीची एक फिरती अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे. जेव्हा एखादी अंडरग्राउंड केबल खराब होते, तेव्हा नेमका बिघाड कुठे झाला आहे हे शोधण्यासाठी संपूर्ण रस्ता किंवा जमीन खणणे शक्य नसते. अशा वेळी या टेस्टिंग व्हॅनचा वापर केला जातो. या व्हॅनमुळे बिघाडाचे अचूक ठिकाण कळते, त्यामुळे कमीत कमी खोदकामात दुरुस्ती शक्य होते आणि वीजपुरवठा लवकर पूर्ववत होतो.

🔎 हे वाचलं का?:  दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांनो सावधान! नाशिकमध्ये ३३६ जणांवर कारवाई

त्याचप्रमाणे जमिनीखाली केबल नेमकी कुठून आणि किती खोलीवरून गेली आहे, याचा अचूक मार्ग शोधणे. केबल ओळखणे ,एकाच ठिकाणी अनेक केबल्स असल्यास, नेमकी फॉल्टी केबल कोणती आहे ते ओळखणे. तासनतास किंवा दिवसभर शोधण्यात जाणारा फॉल्ट काही मिनिटांत किंवा तासांत अचूक सापडतो.
विनाकारण पूर्ण रस्ता किंवा फुटपाथ खणावा लागत नाही, ज्यामुळे मोठा खर्च वाचतो. आधुनिक डिजिटल सिस्टीम मुळे फॉल्टचे अचूक लोकेशन मिळते.

🔎 हे वाचलं का?:  सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात आठ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता प्रदीप दाळू आणि गोपाल पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिनेश चावडा, जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांच्यासह चाचणी विभागाचे अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790