Amazon

नाशिक: पाच मिठाई दुकानांचे परवाने निलंबित; एफडीएची कारवाई

नाशिक। दि. ५ नोव्हेंबर २०२६: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने शहरासह जिल्ह्यात दुकानांची तपासणी सुरू आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच मिठाई दुकानांचे परवाने निलंबित केले.

तपासणीत अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळले. अस्वच्छता, झुरळ तसेच अन्न सुरक्षा व मानके नियमांमधील तरतुदींचे गंभीर उल्लंघन निदर्शनास आले. या कारवाईमध्ये देवळाली कॅम्प येथील मे. सिर्वी स्वीट्स, अशोका मार्ग येथील मे. कृष्णा सागर स्वीट्स, तिडके कॉलनी येथील मे. पंचम स्वीट्स, ओझर बस स्थानकाजवळील मे. साई बिकानेर स्वीट्स, भगूर येथील मे. उत्तम फरसाण अॅण्ड स्वीट्स यांचा समावेश आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सुहास मंडलिक, अश्विनी पाटील, प्रतीक भड, ऋतुजा नवले यांनी केली.

Loading

🔎 हे वाचलं का?:  दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांनो सावधान! नाशिकमध्ये ३३६ जणांवर कारवाई
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790