नाशिक। दि. १४ जुलै २०२६: मुलींच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, नाशिक येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळामार्फत गृहपाल (महिला), लिपिक नि टंकलेखक, भांडारपाल, शारीरिक प्रशिक्षण निदेशक (पुरूष) व शिपाई या अशासकीय पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित पदाचा अर्ज, आवश्यक कागदपत्रांसह दि. २१ जुलै २०२६ (मंगळवार) रोजी सकाळी ११.०० वाजता मुलाखतीसाठी मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, सैनिकी मुलांचे वसतिगृह, पत्रकार कॉलनी, त्र्यंबक रोड, शासकीय दूध डेअरीसमोर, नाशिक येथे उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे संचालक कर्नल (निवृत्त) मकरंद देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
गृहपाल (महिला) १ पद, लिपिक-नि-टंकलेखक १ पद, भांडारपाल १ पद, शारीरिक प्रशिक्षण निदेशक (पुरुष) १ पद आणि शिपाई १ पद अशी एकूण पाच पदे भरली जाणार आहेत.
गृहपाल (महिला) पदासाठी पदवी/पदव्युत्तर शिक्षण आवश्यक असून शैक्षणिक कामाचा अनुभव, बी.एस्सी. बी.एड./एम.एस्सी. बी.एड., आयटीचे ज्ञान तसेच वसतिगृहात राहण्याची तयारी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य आहे. लिपिक-नि-टंकलेखक पदासाठी पदवी/पदव्युत्तर शिक्षण आवश्यक असून माजी सैनिक तसेच सैन्यातील लिपिकीय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.भांडारपाल पदासाठी पदवी/पदव्युत्तर शिक्षण आवश्यक असून माजी सैनिक किंवा सैन्यदलातील भांडारपाल म्हणून अनुभव असलेल्यांना प्राधान्य असणार आहे. शारीरिक प्रशिक्षण निदेशक (पुरुष) पदासाठी पदवी/पदव्युत्तर व बी.पी.एड. पात्रता आवश्यक असून शारीरिक प्रशिक्षणाचा अनुभव तसेच माजी सैनिकांना प्राधान्य आहे. शिपाई पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून कार्यालयीन कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य असणार आहे.
अधिक माहितीसाठी 9703548457 किंवा 6362498419 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.
![]()


