नाशिक: स्कूल ऑफ आर्टिलरीतर्फे १८ मे रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके

नाशिक। दि. ९ मे २०२६: जनरल स्टाफ ऑफिसर, मुख्यालय, तोफखाना (स्कूल ऑफ आर्टिलरी), देवळाली कॅम्प यांच्यातर्फे अधिसूचित ‘झेड’ (Z) सेक्टरमध्ये सोमवार १८ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत जीवंत दारुगोळ्याचा वापर करून तोफखान्याची व मैदानी गोळीबाराची प्रात्यक्षिके (Field Firing and Artillery Practice) केली जाणार आहे.

या गोळीबाराच्या सरावामुळे संबंधित तोफांच्या मारा रेषेत येणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी या परिसरात जाऊ नये, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

या महसुली गावांच्या हद्दीतील काही भाग तोफांच्या माऱ्याच्या रेषेत (Danger Zone) येत आहे त्यांची नावे अशी:
नाशिक तालुका : नांदूर वैद्य, साकूर, बेळगाव कुऱ्हे, वंजारवाडी, लहवीत, अस्वली. हा विशिष्ट भाग धोक्याचा आहे. याबाबत संबंधित गावांना यापूर्वीच दवंडीने कळविण्यात आले आहे.

इगतपुरी तालुका : घोटी खुर्द, लहान घोटीची वाडी, नांदूरवैद्य, टाकेद बुद्रुक, नांदगाव बुद्रुक, साकूर दुमाला, हद्दीतील काही भाग तोफांचे माऱ्यांच्या रेषेत येत आहे. हा विशिष्ट भाग धोक्याचा आहे. याबाबत संबंधित गावांना यापूर्वीच दवंडीने कळविण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना यांचा सराव अधिनियम, १९३८ च्या कलम १० (२) अन्वये मिळालेल्या अधिकारानुसार, वरील दिवशी आणि ठरवलेल्या वेळी (१८ मे २०२६, स. ०८.०० ते दु. १६.००), कोणत्याही व्यक्तीने सदर धोक्याच्या हद्दीत (Danger Zone) प्रवेश करू नये, कोणास जाऊ देऊ नये, तसेच आपली पाळीव जनावरे त्या क्षेत्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

या प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना प्रवेश केल्यास किंवा सूचनेचा भंग केल्यास, संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल (कलम १२ नुसार दंडनीय अपराध). तसेच नियम मोडून प्रवेश केल्यामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी शासनावर राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही अपर जिल्हादंडाधिकारी श्री. राजपूत यांनी म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790